छत्रपती शिक्षण मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालय ,पडघा. येथे राष्ट्रीय सेवा योजना, IQAC आणि पडघा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते, यावेळी श्री. मनोहर भोळे, राजमुद्रा अकँडमी, पुणे यांनी आँनलाईन पध्दती व्दारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, श्री. प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी, गणेशपुरी यांनी विद्यार्थ्यांना स्वानुभव कथन करुन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाला श्री. संजय साबळे पोलीस निरीक्षक, पडघा पोलीस स्टेशन यांच्या सह श्री. अशोक शेरेकर, श्री. भालेराव सर, मुख्याध्यापक, शारदा विद्यालय , प्रा.सावित्री क्रांतीकर प्र.प्राचार्या कला व वाणिज्य महाविद्यालय, पडघा तसेच पडघा महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी, शारदा विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी, के.एम.ई ज्युनिअर कॉलेज चे शिक्षण आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपक पोंक्षे यांनी केले तर आभार प्रा. ज्योती भोई मॅडम यांनी केले .